Friday, 14 November 2014

ठाण्यात गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन

गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसंबंधी एका मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण परिषदेनं केलं आहे. ड वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर अखेरपर्यंत घ्याव्या लागणार आहेत. या सर्व निवडणुका महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया कशी असेल याबाबतची माहिती गृहनिर्माण संस्थांना व्हावी म्हणून ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण परिषदेनं या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. हा मेळावा येत्या रविवारी सहयोग मंदिर सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाणे जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी दिलीप उढाण, राज्य सहकारी गृहनिर्माण परिषदेचे अध्यक्ष सीताराम राणे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसंबंधी सूचना अथवा प्रश्न असल्यास त्या कार्यक्रमाआधी लिखित स्वरूपात देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.