📢 सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना महत्त्वाचे आवाहन
भारत सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत राष्ट्रीय सहकारी डेटाबेस (NCD) अंतर्गत देशातील सर्व सहकारी संस्थांचे जिओ-टॅगिंग (Geo-Tagging) करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक सहकारी संस्थेचे अचूक भौगोलिक स्थान (GPS Location), संस्थेची कार्यरत स्थिती व इमारतीचे छायाचित्र यांची नोंद राष्ट्रीय डिजिटल डेटाबेसमध्ये करण्यात येणार आहे.
यासाठी केंद्र शासनाने NCD GeoTag हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे.
📱 जिओ-टॅगिंग कसे करावे?
१. NCD GeoTag ॲप डाउनलोड करा.
२. Cooperative Society हा पर्याय निवडा.
३. आपल्या संस्थेचे नाव किंवा NCD ID वापरून संस्था शोधा.
४. संस्थेच्या प्रत्यक्ष ठिकाणी GPS Location नोंदवा व इमारतीचे छायाचित्र अपलोड करा.
५. आवश्यक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.
🌐 अधिकृत संकेतस्थळ :
https://www.cooperatives.gov.in/ncd-geotag-app
महाराष्ट्रतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या संस्थेचे जिओ-टॅगिंग लवकरात लवकर पूर्ण करावे, असे फेडरेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
चला, महाराष्ट्रतील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंद राष्ट्रीय डिजिटल नकाशावर करूया!*